आज शनिवार दिनांक ९/८/२०२५ रोजी ठाणे येथील ओक रक्त केंद्रामध्ये सेवा भारती कोकण प्रांत ट्रस्ट, भारत विकास परिषद यांच्या संयुक्त प्रयत्नातून ठाणे शहरातील "मंगलमुखी" (किन्नर) व्यक्तींचा समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती व कार्यकर्ते यांचा रक्षाबंधनाचा उत्सव साजरा करण्यात आला. किन्नर समाजाच्या आजवरच्या प्रवासामध्ये त्यांना ज्या यातना, उपेक्षा, कष्ट व अवहेलना सोसाव्या लागल्या आहे त्या सर्व प्रकारच्या समस्यांना वेगवेगळ्या स्तरातून उत्तरे मिळाली पाहिजे या निखळ हेतूने याचे आयोजन केले होते. केंद्र सरकार राज्य सरकार स्थानिक स्वराज्य संस्था यातून विविध कल्याणकारी योजना बनवल्या जात आहेत परंतु त्याचा लाभ या वंचित घटकापर्यंत पोहोचत नाही ही बोध सर्व किन्नर समाजाच्या व्यक्तींनी बोलून दाखविली.
संघ संबंधित सर्व संघटना व संस्था संघाच्या "व्यक्ती निर्माण"या एकाच उद्देशाने कार्यरत असल्यामुळे यासाठीचे सर्व प्रयत्न केले जाते असे आपण त्यांना सांगितले आहे. या कार्यक्रमाला वेळात वेळ काढून पोलीस अधिकारी माढेकर उपस्थित होते. याव्यतिरिक्त भारत विकास परिषदेचे श्री व सौ ढाकणे, श्री दत्ता भाऊ घाडगे,अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे डॉक्टर कैलास सोनमणकर सेवा भरती कोकण प्रांत ट्रस्टचे किन्नर विषयाचे प्रांत प्रमुख श्री अरुण गवाणकर, श्री उदय लेले जिल्हा सचिव श्री रमेश शिवडेकर, प्रांत सचिव आनंद राऊळ, राष्ट्रसेविका समितीच्या...... उपस्थित होते